४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर
खेड(प्रतिनिधी) जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र झटणाऱ्या येथील पोलीस कर्मचान्यांच्या वसाहतीची दैनावस्थाच झाली आहे. पोलीस कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रयत्नाने सुसज्ज नवीन वसाहत उभारणीसाठी’ ४२ कोटी
रूपयांचा निधी मंजूर झाला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस् ४ किंवा ५ ऑक्टोबरला नवीन वसाहत कामाच्या भूमिपूजनाचा नारळ फुटणार आहे. येथील पोलीस यंत्रणेकडून भूमिपूजन सोहळ्याची तशी जय्यत तयारीही करण्यात येत आहे. यामुळे १८ महिन्यातच पोलीस कर्मचारी हक्काच्या घरात वास्तव्यास जाणार आहेत,येथील ब्रिटीशकालीन पोलीस वसाहत अखेरची घटकाच मोजत आहे. २० खोल्यांची वसाहत पडझडीच्या उंबरठ्यावरच असल्याने सद्यस्थितीत एकही पोलीस कर्मचारी वास्तव्यास नाही.जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांचे लक्ष वेधले होते.
नवीन वसाहतीचा प्रस्तावही मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्यानुसार शिवसेना नेते रामदास कदम
यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करत नवीन वसाहत उभारणीसाठी निधीसाठी साकडे घातले होते. याला अखेर यश आले. नवीन पोलीस कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी ४२ कोटी ५० लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या निधीतून पोलीस कर्मचान्यांसाठी ५२ अद्ययावत खोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे. पोलीस
निरीक्षकांसाठीही स्वतंत्र निवासस्थान उभारण्यात येणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बच्चेकंपनीच्या
विरंगुळ्यासाठी याचठिकाणी ३ सुसज्ज उद्यानांचाही समावेश आहे. तसेच येथे वास्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचान्यांसाठी सर्व सोयीसुविधांयुक्त
मैदानाचाही समावेश आहे. याचठिकाणी नवीन पोलीस स्थानकाचीही उभारणी करण्यात येणार आहे. येथे दैनंदिन कामकाजासाठी पोलीस स्थानकात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत पोलीस वसाहतीसमोर असलेल्या मंदिराची जागाही बदलण्यात येणार असून अद्ययावत मंदिराची
उभारणी करण्यात येणार आहे. याच मंदिरात नागरिकांच्या विसाव्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी सांगितले.
पोलीस कर्मचान्यांच्या नवीन वसाहत काम भूमिपूजनाचा ४ किंवा ५ ऑक्टोबर रोजी नारळ फुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते रामदास कदम, पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांसह पोलीस अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.











