अध्यक्षपदी विठोबा चव्हाण तर सरचिटणीसपदी गणेश चव्हाण यांची निवड
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील श्रीदेवी आदीष्टी शिक्षण मंडळ प्रभानवल्ली खोरनिनकोची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी विठोबा चव्हाण तर सरचिटणीसपदी गणेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
श्रीदेवी आदीष्टी शिक्षण मंडळ प्रभानवल्ली खोरनिनको या संस्थेच्या कार्यकारणीची सर्वसाधारण सभा रविवारी झाली. या सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. गेली ३० वर्ष सुरवातीपासून सक्रिय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या व ९ वर्ष खजिनदार पद ,९ वर्ष सरचिटणीस पद भूषविलेल्या कार्यतत्पर सरचिटणीस विठोबा श्रीपत चव्हाण यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली ,तर उपाध्यक्ष पदी श्रीराम हांदे, कार्याध्यक्षपदी जितेंद्र ब्रिद यांची निवड करण्यात आली. विविध संस्थेमध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या गणेश चव्हाण यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. सह.सचिव पदी अनंत शिंदे यांची फेरनिवड करण्यात आली.गेली तीन वर्षे खजिनदार असलेले मनोहर पांचाळ यांची त्याच पदी निवड करण्यात आली.
संस्थेचे संचालक म्हणून सर्वश्री गणपत शेट्ये, जयप्रकाश सावंत, मंगेश जाधव,सुमेध प्रभूलकर, संदेश प्रभुलकर, दत्ताराम मोसमकर, कृष्णकुमार बेर्डे, ह भ. प. मारुती बुवा गुरव, मनोहर गुरव, शशीकांत चव्हाण, लक्ष्मण म्हेतर, मोहन शिंदे,सुधाकर पालांडे, विनायक बिजम, मनोज बिजम यांची निवड करण्यात आली.











