दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने महिपतगड येथे स्वच्छ्ता व श्रमदान मोहीम

 

खेड (प्रतिनिधी) रत्नागिरी विभाग दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दसरा पूर्वनियोजित महिपतगड येथे स्वच्छता पूर्ण करण्यात झाली.खेड,मुंबई, माणगाव या भागातून दुर्गवीर सहभागी झाले होते या मध्ये महिला व बालकांचा विशेष सहभाग होता.

एकत्रितपणे अगदी उत्साहात पावसाळ्यानंतरच्या मोहिमेस प्रारंभ झाला.मुख्य वास्तुंवरील गवत काढून ती मोकळी करणे अन गडाचा नव्याने निदर्शनास आलेला दरवाजा स्वच्छ करणे, अशी अनेक कामे या मोहिमेत करण्यात आली.
यावेळी दसरा उत्सव महीपत गडावर मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले आहे अशी माहिती रोहित बालदे यांनी दिली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमासाठी मांडवे सरपंच सुनिता कासार यांनी दुर्गविर प्रतिष्ठान च्या सर्व सदस्यांचे अभिनंदन व कौतुक केले