चोरवणे गावच्या श्री रामवरदायिनी देवीचा नवरात्रौत्सवला ३ पासून प्रारंभ

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील श्री.स्वयंभू नागेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी वसलेल्या चोरवणे गावातील नवसाला पावणाऱ्या श्री रामवरदायिनी देवीचा नवरात्र उत्सव ३ ते १२ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.

नवरात्री मध्ये महाअभिषेक,विधिवत पूजा, महामंगल आरती,हरिपाठ, भजन,गरबा ( दांडीया रास),रुपी जागर मंदिर मध्ये आयोजित करण्यात आला आहे.११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत ह.भ.प श्री. प्रकाश सकपाळ धामनंद यांचा स्वराभिषेक अभंगवाणी तथा भक्ति गीतांचा कार्यक्रम आहे.रात्री ८ वाजता श्री.प्रकाश सकपाळ यांच्या तर्फे अन्नप्रसाद ठेवण्यात आला आहे.तसेच १२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता शक्ती तुऱ्याचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.शक्तिवाले शाहीर वेदांत जाधव (रसाळगड) ता.खेड आणि तुरेवाले शाहिर योगेश मुकनाक (तिसे ता. खेड) या दोन शाहिरांची शक्तीतुरा रूपी शब्दा शब्दांची जुगलबंदी आहे.भाविक भक्तांनी उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.आई
असे आवाहन ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई,पुणे,श्री रामवरदायिनी देवस्थान कमिटी,तसेच ग्रामस्थांनी केले आहे .