कोमसाप लांजा तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर

 

 

तालुकाध्यक्षपदी रामचंद्र जाधव यांची फेरनिवड

लांजा ( प्रतिनिधी) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लांजा शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी रामचंद्र जाधव यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

याबाबत संस्थेची सभा बुधवार दी.०२ रोजी लांजा येथे रामचंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले व नवनिर्वाचित कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली.यावेळी रामचंद्र जाधव यांच्या मागील दोन वर्षाच्या कामाची दखल घेवून नवीन कार्यकारीणीमध्ये त्यांचीच पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष डॉ. माया तिरमारे, कार्यवाह प्रकाश हर्चेकर, सहकार्यवाह भीमराव खोत, कोषाध्यक्ष शहाजीराव देशमुख, जिल्हा प्रतिनिधी बाळू नागरगोजे, युवाशक्ती विभाग प्रमुख प्रवीण कांबळे, महिला विभाग प्रमुख सविता पाटील, जनसंपर्क प्रमुख दत्तात्रय देसाई, प्रसिद्धी प्रमुख संदेश कांबळे, कार्यकारिणी सदस्य रिया लिंगायत, मनीषा पाटील, सुधाकर कांबळे, प्रभाकर गवाणकर, नारायण कदम, काशिराम जाधव, सुलभा पोकळेकर, नसीमा मुलाणी, रामचंद्र लांजेकर तर सल्लागार आदम मापारी, वसंत देसाई, गजानन जगताप, यांची निवड करण्यात आली आहे.

सभा इतिवृत्त वाचन करून प्रकाश हर्चेकर यांनी उपक्रमांचा आढावा घेतला. सहकार्यवाह भिमराव खोत यांनी आभार मानले. कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, कोमसाप जिल्हा अध्यक्ष आनंद शेलार, कोमसाप जिल्हा सचिव राजेश गोसावी यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. सर्व नूतन कार्यकारणी चे तळुक्याभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.