कोटकामते,भगवती मंदिर येथे शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात

श्री देवी भगवती इनामदार संस्थान, कोटकामते, देवगड, सिंधुदुर्ग येथे २ ऑक्टोबर २०२४ ते १३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. हा उत्सव सुमारे साडेतीनशे वर्षांपासून धार्मिक वातावरणामध्ये, पारंपारिक पद्धतीने आयोजित केला आहे.

उत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये सकाळी ५.०० वाजता काकड आरती, ६.०० ते ७.०० वाजता महापूजा, १०.०० ते १२.०० वाजता शास्त्रीय गायन, ४.०० ते ५.०० वाजता सनई चौघडा वादन, संध्याकाळी ५.०० ते ७.०० वाजता शास्त्रीय गायन, ७.०० ते ९.०० वाजता भजन, ९.०० ते ९.३० वाजता प्रवचन, ९.३० ते ११.०० वाजता आरती आणि पालखी परिक्रमा यांचा समावेश आहे.

विशेष कार्यक्रमांमध्ये महिलांचे भजन मंडळ, तसेच नृत्य पथकांचे सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने विविध नामवंत कलाकारांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.