रत्नागिरी : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत सभागृह नाचणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वावरील 9 सप्टेंबर 2018 मधील अनुच्छेद ३९-क व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. या शासन निर्णयान्वये ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांचा वृध्दापकाळ चांगल्या प्रकारे घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे. शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्याचे सर्वसमावेश धोरण निर्गमित आले आहे. ज्येष्ठ नागरिकांकरीता आरोग्य व कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरीक यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी ॲडव्होकेट श्रीमती कार्तिकी किरण शिंदे यांनी ज्येष्ठांच्या विविध अडचणीबाबत कायदेविषयक मार्गदर्शन केले. समाज कल्याण विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाला नाचणे गावाचे सरपंच ऋषिकेश भोंगले, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य वसंत धर्माजी झगडे, चंद्रकांत भिकाजी नावेंकर, श्रीकांत मांडवकर, रोहिणी शरद डोंगरे, दत्तात्रय पांडुरंग चाचले, जर्नादन शंकर निकम, समाज कल्याण विभागातील दिपाली केळकर, विजया मोरे, संतोष खेडेकर, उमेश अष्टुरे आदी उपस्थित होते.











