परुळेबाजार व मेढा येथे सिंचन विहीर, गुरांचे गोठे व फळबाग लागवड कामाचे भूमिपूजन…

 

वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. दिनेश पाटकर यांची उपस्थिती

परुळे : प्रतिनिधी : ग्रामपंचायत परुळेबाजार व मेढा ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर सिंचन विहीर, गुरांचे गोठे व फळबाग लागवड कामाचे भूमिपूजन वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. दिनेश पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

या कार्यक्रमाला कृषी विस्तार अधिकारी सौ. काविटकर मॅडम, श्री. शिरसाट. यासह परुळेबाजार गावच्या सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, ग्रामसेवक शरद शिंदे, तंटामुक्त अध्यक्ष श्री पुरुषोत्तम प्रभू, प्रसाद पाटकर, तसेच लाभार्थी कृष्णा पाटकर, उमेश नेवाळकर, मोहन वाडेकर, अनुराधा प्रभू यांच्या विहीर कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकरी वर्गासाठी विविध योजना आहेत. त्यांची माहिती गटविकास अधिकारी श्री. पाटकर साहेब यांनी उपस्थितांना दिली.