मसुरे | झुंजार पेडणेकर : आंध्रप्रदेश क्रिकेट असोशिएशनच्या 16 वर्षाखालील (मुलगे / मुली ) संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदी मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे सुपुत्र प्रसिद्ध क्रिकेटपट्टू शाहूलखन सतीश बांदिवडेकर यांची निवड झाली आहे. भारतीय संघांचे माजी खेळाडू सुनील जोशी यांच्या शिफारशीने ही निवड झाली आहे.
15 नोव्हेंबर रोजी त्यांना नॅशनल अकॅडमी येथे उपस्थित राहण्याचे द आंध्र क्रिकेट असोशिएशन कडून कळविण्यात आले आहे. शाहूलखन बांदिवडेकर यांचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी गोवा, मुंबई येथील विविध क्रिकेट स्पर्धेत सहभाग असतो. तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात देखील ते सहभागी असतात. माजी सरपंच सतीश बांदिवडेकर यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.











