चिपळूण (प्रतिनिधी):-– भाजपा बूथ अध्यक्ष आणि सदस्यांनी बैठकीचे आयोजन करून मतदार यादी वाचन, लाभार्थी संपर्क अभियान सुरू करावे. जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा जास्तीत जास्त फायदा भाजपला होईल, असे भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले.
भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप चिपळूण तालुक्यातील पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष यांची बैठक नुकतीच संपन्न झाली.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात येणाऱ्या १३० बूथची संघटनात्मक रचना पूर्ण करण्यात आली. शक्ती केंद्र प्रमुख, प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुखांना पाच पाच बूथ वाटून देण्यात आले, अशाप्रकारे १३० बूथ अध्यक्ष , १+ १० बूथ कमिटी, तसेच पन्ना समिती तयार करण्यात आली.
चिपळूण तालुका संघटनात्मक रचनेचा आढावा तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना दिला. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई चव्हाण, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस शिल्पाताई मराठे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, संगमेश्वर तालुकाध्यक्ष रूपेश कदम, चिपळूण शहर प्रभारी निलेश भुरवणे, जिल्हा चिटणीस विनोद भूरण, संतोष वरेकर, तालुका उपाध्यक्ष संदिप सुखदरे, ओंकार बापट, राजन निगडे, मारूती होडे, विष्णू सकपाळ, तालुका सरचिटणीस नीलिमा पाटेकर, एकनाथ सहस्रबुद्धे, तसेच तालुक्यातील मोर्चा, आघाडी, सेलचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष उपस्थित होते












