वाफोली धोकादायक वळणावर पुनः अपघात 

 

ओटवणे (प्रतिनिधी )बांदा दाणोली मार्गांवर वाफोली येथील धोकादायक वळणावर पुनः एकदा अपघात. बांदयाच्या दिशेने आंबोली मार्गे जाणाऱ्या MH. 09-4613 या कॅन्टरचा डोंगरीकर हॉटेल नजीक धोकादायक वळणावर अपघात झाला अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र सुदैवाने जीव हानी झाली नाही. वाफोली येथील हे धोकादायक वळण डोके दुखी ठरत असून याच वळनावर गेल्या तीन चार महिन्यात 25 हुन अधिक गाड्यांचे अपघात झाले. या वळणाच्या नजीक गतिरोधक बसविणे गरजेचे होते आणि तसा गतिरोधक बसाविण्यात आला मात्र फायबर चा गतिरोधक महिन्या भरातच तुटून पडला त्यामुळे या ठिकाणी कायम स्वरूपी टीकणारा गतिरोधक गरजेचा आहे.

 

 

मात्र कितीही मागणी करा जो पर्यंत या वळणावर मोठा अपघात होऊन जीवित हानी होत नाही तोपर्यंत बांदकाम खाते आपले बंद केलेले डोळे उघडणार नाही. अजून किती अपघात झाल्यावर याची दखल घेतली जाईल असा संतप्त सवाल वाहन चालक तसेच ग्रामस्थानमधून विचारला जात आहे.