श्रृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ आयोजित नवरात्री उत्सव विविध कार्यक्रमानी साजरा

मोडकाआगर | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर
नवरात्री उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते नवरात्री उत्सव विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. घटस्थापनेच्या दिवशी श्री दुर्गादेवी मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दररोज रात्री दांडिया रास, तसेच उत्कृष्ट दांडिया नृत्य करणाऱ्याचा सन्मान चिन्ह सन्मान करण्यात येत होता. एन.एन.आर्किटेक्चर अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रा.प्रीतम पुष्कर नाटुस्कर व पुष्कर विनायक नाटुस्कर यांच्या सौजन्याने महिलांसाठी खास आकर्षण म्हणून दरम्यान लकी ड्रॉ मध्ये रोज एक सोन्याची नथ जिंकण्याची संधी मिळाली. टी.डब्ल्यू. जे. कंपनीच्या वतीने भावार्थ ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये यामध्ये बालगटात प्रथम आराध्या मोरे द्वितीय उर्वी बावधनकर, तृतीय ओम नागवेकर,खुला गटात प्रथम कविता जाधव, द्वितीय सारा वेल्हाळ तृतीय अनुष्का कदम उत्तेजनार्थ संस्कार बोरकर, ग्रुप डान्स मध्ये प्रथम जिल्हा परिषद शाळा पाटपन्हाळे शाळा , द्वितीय क्रमांक मयूर पवार व वेदांत मेस्त्री, तृतीय मयुरेश जावरे ग्रुप त्याचप्रमाणे फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये बालगटामध्ये प्रथम आराध्या मोरे, द्वितीय शौर्य अंभोरे, तृतीय कैवल्य क्षीरसागर, किशोर गटामध्ये प्रथम सारा वेल्हाळ, द्वितीय अस्मि कदम तृतीय आर्या बागकर उत्तेजनार्थ अर्जुन वेल्हाळ, खुला गटामध्ये प्रथम समीर सावंत ,द्वितीय श्लोक क्षीरसागर तृतीय सोनाली राठोड उत्तेजनार्थ वैभव कदम या सर्व विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

 

 

सर्व विजेता स्पर्धकांचे बक्षीस वितरण,तसेच नवरात्री उत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदार व महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी एन.एन.आर्किटेक्चर अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रा.प्रीतम नाटुस्कर व पुष्कर नाटुस्कर, उपसरपंच असीम साल्हे, पत्रकार गणेश किर्वे, रमेश वेल्हाळ, गजनान वेल्हाळ, गुलाम, तांडेल, स्वप्निल घाग, मूर्तिकार समीर वेल्हाळ,अमिष कदम,पूजा वेल्हाळ, कोकण विकास मंडळाचे अध्यक्ष अजय खाडे,निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ अध्यक्ष मनोज (बापू)कोळवणकर, उपाध्यक्ष जय (दादू) गुहागरकर, उत्सव समिती अध्यक्ष सुमित नांदलस्कर , उत्सव समिती उपाध्यक्ष दीपक दळी, प्रसाद कुष्टे, सदस्य गौरव वेल्हाळ, सुभाष रजपूत, वैभव वेल्हाळ, पिंट्या वेल्हाळ,यांच्यासह सर्व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद विचारे, दीपक जावरे, प्रा. रामेश्वर सोळंके, सुनील वरेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री निळकंठेश्वर
नवरात्री उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.