खेड(प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यातील नाणिज येथील जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान वसुंधरा पायी दिंडी श्रीक्षेत्र उपपीठ मुंबई ते श्रीक्षेत्र नाणिजधाम रत्नागिरीपर्यंत ग्लोबल वाॅर्निंग जनजागृती करीत आहेत ही पायी दिंडी १५ ऑक्टोबर रोजी भरणे येथील श्री काळकाई मंदिर येथे दुपारी १२ वाजता आगमन होणार आहे
वसुंधरा पायी दिंडी खेड तालुक्यातील खवटी येथील केदारनाथ मंदिरात सोमवार १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता श्रींच्या पादुकांचे मुक्काम होणार आहे १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा खवटी येथून जगतगुरु स्वामींचा रथ आणि वसुंधरा पायी दिंडी निघुन दुपारी १२ वाजता भरणे येथील काळकाई देवीच्या मंदिरात दाखल होणार आहे
स्वामींच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन खेड तालुका समिती, स्वस्वरुप संप्रदाय खेड-रत्नागिरी यांचे वतीने करण्यात आले आहे.
ही पायी दिंडी श्रींच्या पादुका घेऊन अध्यात्म आणि सामाजिक जनजागरण करत जाणार असून किमान ५ किलोमीटर चालुन आपला सेवाभाव श्रीगुरुंच्या चरणी अर्पण करण्यासाठी वसुंधरा दिंडीत भाविकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन खेड तालुका सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.










