निवखोल येथील मेस्त्री हायस्कूलमागेच सुरू होती ब्राउन हेरॉईनची विक्री

 

पोलिसांनी 26 वर्षीय तरुणीला घेतले ताब्यात

रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरातील मेस्त्री हायस्कुलच्या पाठीमागे निवखोल रस्त्यावर तब्बल 34 हजार रुपयांच्या ब्राउन हेरॉईनसह एकाला शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवार 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.31 वा. करण्यात आली.

 

 

इबादुल्ला मुजीब पावसकर (26,रा.राजिवडा नाका,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार शांताराम झोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सायंकाळी संशयित इबादुल्ला पावसकर हा निवखोल रोड येथे आपल्या ताब्यातील प्लॅस्टिक पिशवीमध्ये 4 ग्रॅम वजनाचा ब्राउन हेरॉईन हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगुन असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस अ‍ॅक्ट कलम 8 (क),22(अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.