काळबादेवी येथे वृध्दाची घराशेजारील विहिरीत उडी घेत आत्महत्या

 

आजाराचे कारण आले पुढे

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील काळबादेवी येथे आजाराला कंटाळून वृध्दाने घराशेजारील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.40 वा. सुमारास उघडकीस आली.
अरविंद मारुती मयेकर (70, रा. काळबादेवी फडजीवाडी, रत्नागिरी) असे विहिरीत उडी घेत आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. रविवारी पहाटे 4.30 वा.सुमारास त्यांची पत्नी अमिता मयेकर या त्यांना उठवण्यासाठी गेल्या असता त्यांना पती अरविंद मयेकर घरात कोठेही दिसून आलेेले नाहीत. त्यांचा आजुबाजुला शोध घेत असताना त्यांच्या पत्नीला अंथरुणाखाली एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी मी माझ्या तोंडाच्या आजाराला कंटाळून शेजार्‍यांच्या विहिरीत जीव देवून आत्महत्या करत असल्याचे लिहिलेले होते.

 

 

त्यांच्या पत्न्ाीने शेजार्‍यांच्या विहिरीत जाउन पाहिले असता त्यांना पती अरविंद मयेकर हे विहिरीमध्ये पालथे तरंगताना दिसून आले. शेजार्‍यांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढून जिल्हा शासकिय रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्ररकणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.