लांजा उबाठा युवासेना शहर प्रमुख अजय सावंत यांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यात उबाठा शिवसेनेची पडझड सुरूच असून आज लांजा उबाठा युवासेना शहर प्रमुख अजय सावंत यांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
गेल्या काही दिवसात तालुक्यातील उबाठा शिवसेनेच्या अनेक आजी माजी पदाधिकारी यांनी ठाकरे शिवसेनेला सोडचिट्टी देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उबाठा) युवासेना शहर प्रमुख अजय सावंत यांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.आज लांजा शहर विकासासाठी कुणाच्या तरी नेतृत्वाची वाट पाहत होते. ते नेतृत्व किरण सामंत यांच्या रूपाने आम्हाला सापडले असून किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत आम्ही शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश केला असल्याचे पदाधीकारी यांनी सांगितले.
यावेळी कौस्तुभ कुरूप,अनिकेत शेडे,श्रेयस शेट्ये ,ओंकार लाड,अक्षय सावंत,आशिष जाधव
अनिकेत शेट्ये,सुरज वाघाटे,,भूषण साळवी ,ऋतिक खानविलकर,यांनी प्रवेश केला. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई ,माजी नगरसेवक लल्ल्या कुरूप,आशिष रेवणकर, हे उपस्थित होते.










