मिरजोळे पाटीलवाडी येथे गावठी हातभट्टीवर धाड

 

 

रत्नागिरी |प्रतिनिधी
शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे गावठी हातभट्टीवर धाड टाकत शहर पोलिसांनी तब्बल 12 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई बुधवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.45 वा. करण्यात आली.
मयुर रवि मोरे (38, रा.किर्तीनगर मजगावरोड,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल शरद कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी दुपारी संशयित हा मिरजोळे पाटीलवाडी येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टी बनवण्यासाठी लागणारे गुळ नवसागर मिश्रीत कुजके 300 लिटर रसायन इतर साहित्य आणि 10 लिटर गावठी दारु आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1919 कलम 65 (ब),(क),(ड),(ई),(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.