गाबीत महोत्सव ठरला यशस्वी !

 

राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम उपरकर : विविध स्पर्धातील विजेत्यांचा गौरव : चार दिवसीय महोत्सवाची सांगता

मालवण | प्रतिनिधी : सर्व गाबीत बांधवांच्या सहकार्यातून गाबीत महोत्सव यशस्वी झाला. गाबीत एकत्र आले तर काय करू शकतात हे महोत्सवातून आम्ही दाखवून दिले आहे. मात्र आम्ही महोत्सव करून गप्प बसणार नाही. समाज घटक व तरुणांच्या उन्नतीसाठी यापुढे अधिक जोमाने काम करणार आहोत. गाबीत बांधवांनीही एकत्र येत समाजाच्या पाठीशी राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी मालवण येथील गाबीत महोत्सवाच्या समारोपप्रसंगी बोलताना केले.

मालवण दांडी किनाऱ्यावर आयोजित चार दिवसीय गाबीत महोत्सवाची सांगता झाली. चार दिवस गाबीत समाजातील लोकांसाठी विविध स्पर्धा, परिसंवाद, व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात अखिल भारतीय गाबीत समाज संघांचे अध्यक्ष परशुराम उपरकर, प्रा. डॉ. संतोष मेतर, आरोंदा सरपंच गीता तारी, डॉ. श्याम चौगुले, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांना गाबीत भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी गाबीत समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच महोत्सव आयोजनासाठी योगदान देणाऱ्या समाज बांधवांचा गाबीत सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. तर स्थानिक समिती तर्फे राज्य अध्यक्ष सुजय धुरत, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

महोत्सवास सिने अभिनेत्री तारका कांबळी यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, जिल्हा कार्यवाह बाबा मोंडकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, देवगड अध्यक्ष संजय पराडकर, वेंगुर्ला अध्यक्ष राजन गिरप, सावंतवाडी अध्यक्ष ऍड. चांदोस्कर, स्वागत समिती अध्यक्ष अन्वय प्रभू, हरी खोबरेकर, दिलीप घारे, बाबी जोगी, पूजा सरकारे, सेजल परब, नारायण धुरी, सौरभ ताम्हणकर, रुपेश खोबरेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, पांडुरंग कोचरेकर, सुरवी लोणे, माधुरी प्रभू, संमेश परब आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जलतरण स्पर्धा – महिला प्रथम – कु. पायल संतोष सागवेकर, द्वितीय – प्रणाली भास्कर सागवेकर, तृतीय – जागृती ठकसेन सागवेकर (सर्व रा. सागवे – वडपवाडी राजापूर), पुरुष गट – प्रथम – चेतन भिकाजी बांदेकर ( वेंगुर्ला), द्वितीय – अमेय शशिकांत कोचरेकर ( श्रीरामवाडी वेंगुर्ला), तृतीय – गौरेश ठकसेन सागवेकर (सागवे – वडपवाडी राजापूर). नौकानयन स्पर्धा – प्रथम – उदय जाधव, मंदार घारे, रामचंद्र जाधव. द्वितीय – प्रथमेश गावकर, संजय गावकर, सुशांत गावकर. तृतीय – पंकज मालंडकर, धर्मराज कुबल, कुणाल कोचरेकर आणि पाककला स्पर्धा – प्रथम – सानिका दत्तात्रय बांदकर (कोळंबीचे लॉलीपॉप), द्वितीय – प्रांजल प्रदीप सारंग (कोळंबी सामोसे), तृतीय – सौ. आरोही अमित गावकर (शेंगाळ्याची कवटे) यांना पारितोषिके देण्यात आली.

रात्रौ मुंबई येथील कलाकारांचा ऑर्केस्ट्रा सादर झाला. या कलाकारांनी विविध हिंदी मराठी व चित्रपट गाणी तसेच नृत्ये सादर करत या महोत्सवाच्या समारोपात रंगत आणली. या गाण्यांवर गाबीत समाज बांधवांनी देखील ठेका धरत नृत्य करत धमाल केली. महोत्सव यशस्वी ठरला.