एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयातील 29 विद्यार्थ्यांची क्यू स्पायडर कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली च्या कॉम्प्युटर आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील 29 विद्यार्थ्यांची क्यू स्पायडर कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. सदरची निवड प्रक्रिया प्राचार्य डॉ. डी . एस. बाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व क्यू स्पायडर कंपनी मार्फत राबविण्यात आली होती.
विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षण जून 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी सदर मुलांना प्राप्त होणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती यामध्ये ॲप्टीट्यूड व ग्रुप डिस्कशन या फेरीतून सदर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

 

 

एसएसपीएम मागील 25 वर्षापासून संस्थापक मा. खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष सौ नीलम ताई राणे उपाध्यक्ष डॉ. निलेश राणे सचिव मा. आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे.
सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलम ताई राणे, उपाध्यक्ष डॉ. निलेश राणे, सचिव आ. नितेश राणे, प्राचार्य डॉ. डी एस. बाडकर, सर्व विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कोऑर्डिनेटर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.