बुधवळेत वीज पडून घरातील विद्युत साहित्य जळाले!

मसुरे | झुंजार पेडणेकर : बुधवळे मळेशेत धनगरवाडी येथील गणेश जाधव यांच्या घराजवळ गुरुवारी रात्री विज पडून विजमिटर तसेच घरचे वायरिंग, वीज बोर्ड निकामी होऊन नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी तलाठी देसाई, सरपंच पानवलकर, ग्रामपंचायत सदस्य बंडू पडवळ तसेच समिर गुरव, समिर शेलार, संदीप बुधवळेकर यांनी केली. जाधव यांचे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे.