मठ येथील युवती व महिलांचा शिवसेनेत प्रवेश…

उबाठा शिवसेनेला धक्का: राजन तेली यांच्या उबाठा तील पक्षप्रवेशाचा परिणाम

वेंगुर्ले : प्रतिनिधी : येथील शिवसेना कार्यालयात आज शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी मठ गावातील ३५ महिलांनी राजन तेलींच्या उबाठा मधील पक्ष प्रवेशाने नाराज होत मठ गावच्या माजी ग्रामपंचयात सदस्य यमती नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक अँङ निता सावंत-कविटकर, उपजिल्हा संघटक शितल साळगांवकर व तालुका महिला संघटक दिशा शेटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी उपस्थित मान्यवरात महिला जिल्हा संघटक अँङ निता सावंत- कीबटकर, उपजिल्हा संघटक शितल साळगांवकर, तालुका महिला संघटक दिशा शेटकर, शहर महिला संघटक अँङ श्रध्दा बावीस्कर, शिवसेनेच. जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, तालुका युवक प्रमुख स्वप्नील गावडे, आडेली विभाग प्रमुख मितेश परब, मनाली परब यासहीत महिलांचा व शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.