राजन तेली दिल्या घरी सुखी रहा
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा खोचक टोला
मालवण | प्रतिनिधी : राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाकरे गट नेत्यांना खुश करण्यासाठी काही केविलवाणे आरोप केले. हे हास्यास्पद म्हणवे लागेल. अहो तेली ज्या ठाकरे गटात प्रवेश केला तेथे मुख्यमंत्री वडील व मुलागा मंत्री होता. हे आठवा, आताही वडील आमदार मुलगा आमदार हेच ठाकरे गटात आहे. आणि नातेवाईक येतील ते वेगळे.
आमचे नेते निलेश राणे मालवण कुडाळ मतदारसंघातील जनतेच्या आग्रहाखातर निवडणुक रिंगणात आहेत. या माणसानं गेली 4 वर्ष तन मन धन अर्पून सर्व सामन्यासाठी काम केल. म्हणुनच मायनस असलेला मतदार संघ पक्षाचा दृष्टीने प्लस करुन दाखवला आणि त्याचं जोरावर किमान 50 हजार च्या मताधिक्याने निलेश राणे आमदार म्हणून निवडून येणार राजन तेलिनी स्वतःची चिंता करावी. असा टोला भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी लगावला.












