मतदारसंघ प्रगतशील विकासशीलसाठी निलेश राणे यांच्या हातीच नेतृत्व हवे : आमदार नितेश राणे
कुडाळ : कुडाळ मालवणचे पुढील पाच वर्षाचे भवितव्य निलेश राणे यांच्याच हाती असेल. कुडाळ मालवणचे फिक्स आमदार निलेश राणेच. प्रगतशील विकासशील कुडाळ मालवणसाठी आमदार म्हणून निलेश राणे यांच्या हाती नेतृत्व असेल. असे कौतुकोदगार आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
राणे साहेबांनी हा मतदारसंघ उंचीवर नेला. त्यांचा सर्व ठिकाणी दरारा होता. हे 2014 पूर्वीचे दिवस विकासाचे होते. मात्र त्या नंतर येथील आमदार अपघाताने झाला. विकास ठप्प झाला.
मागील दहा वर्षे पहा या भागातील आमदार यांनी काहीच केले नाही. आठ वर्षे सत्तेत होते. त्यांचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते. मात्र काहीचे केले नाही. विधनसभेत जनतेचे प्रश्न मांडू शकले नाहीत. गरजेचे असलेले मच्छिमार प्रश्न सुद्धा आक्रमक पणे मांडले नाहीत. पारंपरिक मच्छिमार यांच्या पोटावर हायस्पीड येतात. त्यांचे प्रश्न आठ वर्षात सोडवू शकले नाही. विधानसभेत इकडे तिकडे गप्पा मारणे हेच काम. विधानसभेत काही बोलत नाहीत, अधिकाऱ्यांवर दरारा नाही. असे हे आमदार.
या आमदाराने काय केले असेल तर खुल्या व्यासपीठावर या आणि सांगा, हिम्मत आहे? मी सत्तेत नसताना दुप्पट निधी आणला. ते सत्तेत असताना आणू शकले नाही. असेही नितेश राणे म्हणाले.
निलेश राणे यांचे काम लोकसभेत आदर्शवत होते. पंतप्रधान ग्रामसडक मधून अनेक रस्ते आणले. त्यांची कामाची पद्धत विकासाची आहे. निलेश राणे यांच्याकडे विकासाची तळमळ आहे. या मतदारसंघाचा कायापालट ते करणार. म्हणून एकच निर्धार निलेश राणे मालवण कुडाळ आमदार. असे नितेश राणे म्हणाले.
महायुती सरकारने अनेक योजना आणल्या. अनेक माता भगिनी समाधानी आहेत. सर्वसामान्य जनता खुश आहे. मात्र वैभव नाईकचे पक्षप्रमुख व महाविकास आघाडी नेते लाडकी बहीण योजना बंद करू म्हणतात. म्हणून वैभव नाईक यांना प्रश्न विचारा आणि मतदानातून उत्तर द्या. प्रगतशील विकासशील कुडाळ मालवण साठी निलेश राणे यांच्या हाती नेतृत्व द्या. असेही नितेश राणे म्हणले.










