विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोयनार – कोंडीवाडी येथील इसमावर गुन्हा दाखल !

 
खेड (प्रतिनिधी)
विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी तालुक्यातील पोयनार- कोंडीवाडी येथील एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय हनुमंत धुमक (५९, रा. पोयनार- कोंडीवाडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या  इसमाचे नाव आहे. विजय हनुमंत धुमक हा आपल्या ताब्यात विनापरवाना असलेल्या ५० हजार रूपये किंमतीच्या सिंगल बॅरल असलेल्या ठासणीच्या बंदुकीसह लहान-मोठे छरे व गनपावडरसह २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मिळून आला. म्हणून विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकाचे शिपाई राहुल रामचंद्र कोरे यांनी फिर्याद दिल्यावरून  विजय धुमक याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला बी. एन. एस. एस. ३५ (३) प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे.