कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांनी व्यक्त केल्या भावना
मालवणातील महायुतीचा मेळावा हाऊसफुल
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या सोबतीने राणे साहेबांनी पहिली निवडणुक लढवली. आज तीच शिवसेना आणि तेच धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणुक लढवत असताना मला आनंद होत आहे. राणे कुटुंबाला भरभरून देणाऱ्या या जनतेचे ऋण फेडायचे आहेत. मागील दहा वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढतांना जनतेची सेवा करायची आहे. राज्यातील पाच प्रमुख मतदारसंघात हा मतदारसंघ आणायचाच आहे. सर्वच ठिकाणी जनतेचे प्रेम मिळतं आहे. जिवाभावाचे सहकारी भेटत आहेत. मी भारावून गेलो आहे. अश्या उत्स्फूर्त भावना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांनी व्यक्त केल्या.
मालवण तालुका शिवसेनेचा मेळावा बुधवारी जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हाऊसफुल प्रतिसादात संपन्न झाला.
मेळाव्यात निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ कणकवली विधानसभा समन्वयक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांचा नियुक्तीपर सत्कार करण्यात आला.
यावेळी आनंद शिरवलकर यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख, सुरेश चौकेकर जिल्हा सरचिटणीस, मंदार लुडबे युवा जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

यावेळी कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, संघटक रुपेश पावसकर, उपाजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, महेश राणे, योगेश तुळसकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, युवासेना जिल्हा पदाधिकारी प्रितम गावडे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष हर्षद पारकर, महिला आघाडी उपाजिल्हाप्रमुख निलम शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, सरपंच पुनम वाटेगावकर, सरपंच स्नेहल बिरमोळे, सरपंच रविना घाडीगावकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, संतोष साठविलकर, संतोष कोदे, सुशांत घाडीगावकर, मंगेश गांवकर, मधुकर चव्हाण, सुधीर साळसकर, बाळा माने, दिलीप बिरमोळे, प्रसाद गावडे, पराग खोत, चंद्रकांत गोलतकर, सुरेश चौकेकर, दिलीप बिरमोळे, उमेश बिरमोळे, बाळा वेंगुर्लेकर, जे्रॉन फर्नांडिस, महेश बागवे, छोटू ठाकुर, राजु सावंत, बाळा वेंगुर्लेकर, चंद्रकांत गोलतकर, मनोज हडकर, मिहीर राणे, राजु बिडये यांसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. राजा सामंत यांनी सूत्रसंचालन केले.
निलेश राणे म्हणाले, दत्ता सामंत यांना अनेक ऑफर होत्या मात्र मात्र ते नेहमी राणे साहेबांसोबत राहिले. मी पण त्यांना तीन वर्षा पूर्वी विचारले तुम्ही आमदारकी लढा मात्र दत्ता सामंत यांनी नकार दिला. राणे साहेबांच्या 2014 च्या निवडणुकीतीत पराभवाचा बदला विजयातून घेण्यासाठी राणे कुटुंबातील व्यक्ती हवी. तेव्हाही दत्ता सामंत यांनी सांगितले निलेश राणेच आमदार आणि त्या नंतर घुमडाई मंदिरात सांगितले निलेश राणेच आमदार होणार. त्यानुसार दत्ता सामंत काम करत असून सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने ते करत असलेल्या जनसेवेचे निलेश राणे यांनी विशेष कौतुक केले.
निलेश राणे पुढे म्हणाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमचे घर पाडण्याचा प्रयत्न केला. अनेक कट रचले गेले. मात्र राणे कुटुंब खंबीर राहिले. मात्र ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले, सत्ताही गेली. त्यानंतर आलेल्या महायुती सरकारने जनहिताची कामे केली. अनेक योजना आणल्या. आज जनता महायुती सरकारवर आनंदी आहे. समाधानी आहे, याचा आनंद असल्याचे निलेश राणे म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार
जनतेची सेवा करायची आहे, विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. मला उमेदवारी दिली त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार. आता जनतेच्या पाठिंब्यावर महायुती पदाधीकारी कार्यकर्ते यांच्या सोबतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेले मोठे मताधिक्य मिळेल. हा विश्वास दिसून येत असल्याचे निले्श राणे म्हणाले.












