शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आवारामधील कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी टी आर पी येथील हॉटेल सावंत पॅलेस ला इंडस्ट्रियल भेट दिली.
या भेटीमध्ये कौशल्य विकास केंद्रातील फ़ूड एंड बेवरेज सर्विस असोसिएट आणि असिस्टंट शेफ, फ्रंट ऑफिस या बॅच मधील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी कौशल्य विकास केंद्राच्या शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांना सर्व विभाग दाखवून विस्तृत महिती दिली.
या वेळी हॉटेल सावंत पॅलेसच्या प्रत्येक विभागाच्या स्टाफने रिसेप्शन-फ्रंट ऑफिस, रेस्टॉरंट, बैंक्वेट , रूम सर्विस या विभागांमध्ये कशा प्रकारे कामकाज चालते याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह महिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना आजच्या भेटीमध्ये या क्षेत्रातील नवनवीन माहिती अनुभवायला मिळाली याबद्दल हॉटेल सावंत पॅलेस व कौशल्य विकास केंद्र यांचे आभार व्यक्त केले तसेच हॉटेल चे मालक शकील सावंत सर यांनी हॉटेल स्थापनेपासून त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची कल्पना कशी साकार झाली या विषयी आवर्जून सांगितले तसेच त्यांनी रत्नागिरी च्या विकासाच्या दृष्टीने अपेक्षित असणारे बदल आणि त्या साठी त्यांचे सुरू असणारे प्रयत्न सांगितले .
या कार्यक्रमासाठी हॉटेल सावंत पॅलेस चे मॅनेजर नकाश सर व शेख सर यांनी विशेष सहकार्य केले. कौशल्य विकास केंद्राच्या प्लेसमेंट हेड सौ अश्विनी वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या इंडस्ट्रियल भेटीमुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संधींची माहिती होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला आणि हॉटेल व्यवस्थापनाचे आभार मानले.
या प्रसंगी सर्व विद्यार्थी, सावंत पॅलेस हॉटेलमधील सर्व कर्मचारी, कौशल्य विकास केंद्राच्या प्लेसमेंट हेड सौ अश्विनी वाणी , शिक्षकवर्ग श्री अमेय मुळ्ये, श्री तेजस टिकेकर,श्री ऋत्वेज शिरधंकर ,श्री ऋषिकेश मेहेंदळे आदी कर्मचारी उपस्थित होते.











