2 नोव्हेंबर रोजी जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मंडणगड l प्रतिनिधि – स्व.सुरेखाबाई सहदेव माळी यांचे पुण्यस्मरण करीत आईचा स्मृतिगंध जपण्यासाठी पाले येथील माळी कुटुंबियांचेवतीने 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री ८ वाजता संस्कारांचा दिपोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमीत्ताने कै.भिकु गंगाराम माळी चौक पालकोंड रंगमंच येथे गायक दीप जोशी यांचा अमृताचे तिर्थ चरणी हा लाईव्ह गायन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. याचबरोबर शांताराम पवार यांचे आईचा जीवन प्रवास या विषयावर व्याख्यान होणार आहे. यानंतर आई वडिलांना समर्पित असलेल्या जाखडी नृत्य स्पर्धेच आयोजन कऱण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून जीवनातील आईवडिलांचे महात्म्य, महत्व अधोरेखित करून जागृती करण्याच्या हेतूने समाज प्रबोधनात्मक स्पर्धा भरविण्यात आली आहे. यात जय हनुमान नाच मंडळ मुमुर्शी करंजमाल, पेणजाई नृत्य कला पथक पेण तर्फे तळे, भैरवनाथ नृत्य कलापथक तुळशी गणेशवाडी, हनुमान नृत्य कला पथक मुर, मानाईदेवी नृत्य कला पथक सव देऊळवाडी, कै. तात्याजी शिंदे प्रतिष्ठान नाच मंडळ सव उगवतीवाडी पद्मावती नृत्य कला पथक मंडळ चोचिंदे ही सात नाच मंडळे सहभागी झाली आहेत. तालुकावासीयांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सुनील माळी, सचिन माळी, अमित माळी, विनायक हंबीर व माळी कुटुंबीय यांनी केली आहे.










