बेळणे खुर्द येथे वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस; घरांवर झाडे पडून लाखोंचे नुकसान

कणकवली : कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे आज झालेल्या प्रचंड विजेच्या कडकडाटाने व वादळ वाऱ्यासह पावसाने राहत्या घरांवर झाडांची पडझड होऊन घरांचे लाखोंचे नुकसान झाले. बेळणे खुर्द सरपंच अविनाश गिरकर,पोलीस पाटील राजेंद्र चाळके यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यात रामचंद्र चाळके,राजेंद्र सकपाळ यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.

त्याचप्रमाणे या वादळी वाऱ्याने वीज वितरण कंपनीचे जवळपास दहा विद्युत पोल मोडून पडल्याने या महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.त्यामुळे बऱ्याच प्रमाणात वीज पुरवठा ही खंडित आहे . त्याचप्रमाणे नांदगाव विभागातही मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने झोडपले आहे