खेड (प्रतिनिधी) दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी कोकण मार्गावर १ नोव्हेंबरला मडगाव-सीएसएमटी मुंबई एकेरी स्पेशल धावणार आहे.
०२०५२ क्रमांकाची ही स्पेशल मडगाव येथून सकाळी ८ वा. सुटून त्याचदिवशी रात्री ७.२० वा. सीएसएमटी मुंबई येथे पोहचेल. १६ डब्यांची ही स्पेशल थिविम, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, ठाणे स्थानकांत थांबेल. या स्पेशलला एक विस्टाडोम डबा. जोडण्यात येणार आहे. या स्पेशलमुळे गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.










