दोडामार्ग : प्रतिनिधी : तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या बांधकामात मोठया प्रमाणात योगदान दिलेले नामवंत ठेकेदार तथा नोबेल इंडिया कन्ट्रक्शनचे मालक कमलेश शर्मा यांचे नुकतेच जयपूर येथे निधन झाले. त्यांनी तिलारी परिसरात नव्वदच्या दशकात मोठया प्रमाणात कामे केली होती ठेकेदार म्हणून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता त्यामुळे तिलारी परिसरात अनेक छोट्या मोठ्या ठेकेदारांना त्यांनी मदत केली होती. तसेच तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मंदिरासाठी मोठया प्रमाणात देणगी दिल्या होत्या. तसेच अनेक सामाजिक उपक्रमांना कायम हातभार देत असत. तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील अनेकांना रोजगार उपल्ब्ध करून दिला होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, मेहुणा असा परिवार आहे.










