रत्नागिरी ः प्रतिनिधी : बेदरकारपणे दुचाकी चालवून रिक्षेला धडक देत अपघात करत स्वतःसह अन्य चार जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वा. सुमारास नाचणे पॉवर हाउस बस स्टॉपजवळ घडली.
आर्यन संतोष नागवेकर (20,रा.हातीस,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल बाजीराव कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 30 ऑक्टोबर रोजी लतीकेश भोरे हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-बीसी-0449) मध्ये शेजारी राहणारे संतोष माचिवले यांचा मुलगा प्रज्वल व मुलगी ऐश्वर्या यांना बसवून रिक्षा नाचणे सुपलवाडी ते मारुती मंदिर दिशेकडे जाणार्या रस्त्याने चालवत येउन परकार हॉस्पिटलला जाण्यासाठी नाचणे पॉवर हाउस बसस्टॉपकडून आरोग्य मंदिर दिशेकडे वळवत होता.
त्याच सुमारास आर्यन नागवेकर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एबी-7705) भरधाव वेगाने मारुती मंदिर ते हातीस असा जात होता. तेव्हा त्याच्या दुचाकीची धडक या रिक्षेला पुढील उजव्या बाजुस बसून हा अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक लतिकेश भारे (22), संतोष माचिवले (51), प्रज्वल माचिले (22), ऐश्वर्या माचिवले (20) आणि दुचाकी चालक आर्यन नागेवकर हे पाच जण जखमी झाले.












