महायुतीच्या प्रचाराचा मालवण शहरात शुभारंभ ; पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मालवण शहरांत शनिवारी सकाळी देऊळवाडा येथून करण्यात आला. गतिमान विकासाचा दृष्टिकोन आणि जनतेचा भक्कम पाठिंबा या जोरावर निलेश राणे यांचा विजय निश्चित आहे. असा ठाम विश्वास शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांसह महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, कुडाळ मालवण प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर,
भाजपा शहर प्रभारी संतोष गांवकर, तालुका प्रभारी आप्पा लुडबे, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, राजन वराडकर, जगदीश गांवकर, आबा हडकर, महेश सारंग, नाना साईल, पंकज पेडणेकर, बबलु राऊत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, निषय पालेकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, महिला पदाधिकारी शर्वरी पाटकर, महानंदा खानोलकर, तारका चव्हाण, उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, युवती जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, विलास मुणगेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, सुनील बागवे, नंदू देसाई, किशोर खानोलकर, दशरथ कवठकर, उत्तम पेडणेकर, तोडणकर, खवणेकर यांसह मोठया संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.











