खेड(प्रतिनिधी) भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. प्रभाकर गजानने कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिरमधील ८ वीतील अनुष्का नरेश शिंदेने राज्यस्तर नेटबॉल संघात बाजी मारली. तिची. छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे झालेल्या १४ वर्षे वयोगटात तिने यश प्राप्त केले. तिला क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक संतोष भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्याहस्ते तिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढ्ढा,
, प्राचार्य राजकुमार मगदूम. सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे, प्राचार्य राजकुमार मगदूम, मुख्याध्यापिका पूर्वा मोरे आदी उपस्थित होते.










