खेड| प्रतिनिधी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या वतीने पु. ल. देशपांडे जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ॲड. मिलींद जाडकर यांनी मनोगतात पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेल्या साहित्याच्या’ आज घडीलाही आवृत्यांवर आवृत्त्या प्रकाशित होत असून अशा महनीय व्यक्तीची जयंती साजरी करताना उपकृत झाल्यासारखे वाटल्याचे सांगितले. याप्रसंगी विलास राजवाडकर, विमलकुमार जैन, प्रकाश जैन, अनंतराय प्रभू, विनय माळी आदी उपस्थित होते.