Leopard dies after being hit by an unknown vehicle
दाभोळे वाटुळ मार्गावर लांजा तालुक्यातील कोर्ले येथील घटना
घटनेत मृत बिबट्या हा तीन वर्षे वयाचा


लांजा (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाचा धडकेमुळे नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना दाभोळे वाटूळ मार्गावर लांजा तालुक्यातील कोर्ले येथे घडली आहे. हा अपघात पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्याने घडला असावा असा अंदाज वन खात्याने व्यक्त केला आहे.अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला होता .सुमारे तीन वर्षे वयाचा नर जातीचा हा बिबट्या असून कोर्ले गावचे पोलीस पाटील अली अब्दुल साठविलकर यांनी याबाबतची माहिती लांजा वनपाल दिलीप आरेकर यांना दिली .त्यानंतर वनपाल दिलीप आरेकर यांच्यासह वनक्षेत्र पाल रत्नागिरी प्रकाश सुतार व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. दाभोळे वाटुळ मार्गावर कोर्ले येथील सुनील जोशी यांच्या काजू बागेजवळ हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. बिबट्याच्या मागील बाजूस वाहनाचा जोरात धक्का बसल्याने त्याच्या मागील पायाच्या मध्ये आठ इंच जखम झाली असून डांबरी रस्त्यावर घासत गेल्याने जखम झाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी लांजा यांच्याकडून या बिबट्याचे तपासणी केली असता सदर बिबट्याचा हा मणक्यापासून मोडलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
आज शुक्रवारी पहाटे तीन ते चार वाजता हही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे .या घटनेबाबत वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू केला आहे.सदर तपास विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार आणि वनपाल दिलीप आरेकर हे अधिक तपास करत आहेतदरम्यान मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्य प्राणी आढळल्यास याबाबत माहिती देण्याकरता वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल रत्नागिरी सुर्वे यांनी केले आहे












