सावंतवाडी । प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात शुक्रवारी दुपारी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाकडून संचलन करण्यात आले.
२० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने संचलन करण्यात आले.
यात पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण तसेच उपनिरीक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सशस्त्र पोलीस दल सहभागी झाले होते. सावंतवाडी पोलीस ठाणे येथून या संचलनाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर बाजारपेठ मार्गे गांधी चौक गवळी तिठा ते परत पोलीस ठाणे असे संचलन करण्यात आले.








