विधानसभा निवडणूक २०२४ करिता दापोली आगारातून ५७ गाड्या तैनात

 

काही फे-या रहाणार बंद

दापोली | प्रतिनिधी :- विधानसभा निवडणूक २०२४ साठी मतपेट्या ,अधिकारी व कर्मचारी यांची ने आण करण्यासाठी दापोली आगारातील ५७ गाड्या देण्यात आल्याची माहिती दापोली आगार प्रमुख राजेंद्र उबाळे यांनी दिली आहे.
दापोली आगारातून ५७ गाड्या देण्यात येणार आहेत त्यामधील ०४ गाड्या १८ नोव्हेंबर रोजी व १९ नोव्हेंबर रोजी उर्वरीत ५३ गाड्या सोडण्यात येणार आहेत.
विधानसभा निवडणूकीचा परिणाम दापोली आगारातून सुटणा-या गाड्यांवर होणार आहे. काही फे-या १८ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या काळात बंद रहाणार आहेत.
प्रवाशांनी याकडे लक्ष देऊन प्रवासाची वेळ व गाडी ठरवणे आवश्यक आहे.
कोणत्या फे-या करण्यात आल्या रद्द…..
१०.३० वा.सुटणारी माटवण बोरीवली, दापोली आगारातून सुटणारी ५.३० वा. बोरिवली, ०२ वा. कोल्हापूर, २.३०वा. गणपतीपुळे, ०६.३० वा. रत्नागिरी सदर फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ह्या फेऱ्या १८ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २४ या काळात बंद राहणार असल्याची माहिती आगार प्रमुख राजेंद्र उधाळे यांनी दिली असून प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.