1 हजार 436 मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक; निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
गुहागर | प्रतिनिधी :
गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्या पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाकरीता येथील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.गुहागर विधानसभा मतदारसंघात 322 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघात एकूण 322 मतदान केंद्रावर 1 हजार 436 मतदान अधिकारी नेमण्यात आले आहेत. शिपाई 322, आशा सेविका 322 व स्वयंसेवक 644 तर 43 बस,10 मिनीबस व 4 जीप अशी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारसंघात 53 झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
गुहागर तालुक्यात 46 हजार 593 पुरुष मतदार तर 55 हजार 252 स्त्री मतदार असे एकूण 1 लाख 1 हजार 845 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. खेडमधून 34 हजार 55 पुरुष मतदार तर 35 हजार 454 महिला मतदार असे एकूण 69 हजार 509 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.चिपळूणमधील 34 हजार 863 पुरुष मतदार तर 36 हजार 487 महिला मतदार असे एकूण 71 हजार 350 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.गुहागर विधानसभा मतदारसंघाचा विचार करता सुमारे 1 लाख 15 हजार 511 पुरुष मतदार तर 1 लाख 27 हजार 193 स्त्री मतदार असे एकूण 2 लाख 42 हजार 704 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.











