खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील लोटे एम.आय.डी.सी. येथील लोटेमाळ येथे घराच्या पाठीमागे सुरू असलेला गावठी दारू धंद्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून ७ हजार ५०० रुपये किमतीची ७० लिटर गावठी हातभट्टी दारू पोलिसांनी जप्त केली.
निहार हेमंत वारणकर (वय- ३६) हा गैरकायदा विनापरवाना ७ हजार ५०० रुपये किंमतीची ७० लीटर गावठी हातभट्टीची दारू उद्देशाने ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ मिळून आला. हि कारवाई १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६. ५० वाजता करण्यात आली.
रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार प्रविण कृष्णा खांबे यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर निहार हेमंत वारणकर याच्याविरोधात, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












