खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील पन्हाळजे कोंडवाडी येथील श्री कोंडवाडी हनुमान मंडळ संचलित जय बजरंगबली कला पथकाचा १० वा वर्धापनदिन ३० नोव्हेंबर रोजी
साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सकाळी ७ वाजता श्रींचे पूजन झाल्यानंतर भजन, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यकम व विविध स्पर्धा, कलापथक मुलींचे कार्यक्रम, विविध मनोरंजन स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता कोंडवाडी हनुमान मंडळ व महिला मंडळ यांचे पारंपारिक नृत्य, पारंपारिक आरती, रात्री ९.३० वाजता सत्कार समारंभ होईल. रात्री ११ वाजता बहुरंगी नमन झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कोंडवाडी हनुमान मंडळ व महिला मंडळ यांनी केले आहे.






