सह्याद्री कुणबी संघातर्फे गरजूंना साहित्य वाटप

 खेड(प्रतिनिधी)सह्याद्री कुणबी संघ पुणे येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने हिंगणे येथील श्री छत्रपती प्रतिष्ठानचे निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहवासात दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी गरजूंना ब्लॅकेटचे वाटपही करण्यात आले.
सह्याद्री कुणबी संघाचे अध्यक्ष नीलेश शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यालयाकरिता स्वच्छतेचे साहित्यही वितरीत करण्यात आले. याप्रसंगी सहयाद्री कुणबी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.