दापोली विधानसभा क्षेत्राच्या कामाचं होतंय कौतुक
माखजन |वार्ताहर : विधानसभा, लोकसभेच्या निवडणूक म्हटल्या की बाहेरील मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष,निवडणूक अधिकारी क्रमांक १ नेमले जातात.यांची व्यवस्था करणे आणि निवडणूक प्रक्रिया उत्तम प्रकारे पार पाडणे ही त्या त्या विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.दापोली चे प्रांताधिकारी अर्थानं दापोली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी राबवलेली यंत्रणा लक्षवेधी ठरली.यास्तव विविध तालुक्यातून दापोली येथे दाखल झालेल्या केंद्राध्यक्षांनी,निवडणूक अधिकारी क्रमांक १,२,३ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजित थोरबोले व त्यांच्या सहकारी वर्गाचे अभिनंफन व तोंडभरून कौतुक केले आहे.अनेकांनी प्रत्यक्ष भेटून व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले.तर अनेकांनी व्हाट्सप ग्रुप च्या माध्यमातून दापोली विधानसभा अंतर्गत राबवलेल्या निवडणूक यंत्रणेचे तोंडभरून कौतुक केले.
केंद्राध्यक्ष, निवडणूक अधिकारी १,२,३ यांचे प्रशिक्षण, पोस्टल मतदान प्रक्रिया,प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान साहित्य वाटप,निवडणुकीच्या दिवशी प्रत्येकाला डॉ अजित थोरबोले यांच्या कडून झालेले वैयक्तिक मार्गदर्शन,निवडणूक प्रक्रिया संपल्यावर साहित्य जमा करून घेण्यासाठी असलेली सुसूत्रबद्ध व्यवस्था,येण्या जाण्यासाठी असलेली एसटी बसेस ची सोय,अडचणीच्या ठिकाणी एसटी बसेस पोहचत नसेल तर केलेली छोट्या वाहनांची व्यवस्था,नाश्ता, जेवणाची व्यवस्था,आदी सगळ्याच गोष्टी अगदी काटेकोर पणे झाल्याने दापोली विधानसभा मतदार संघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक कर्मचारी,अधिकारी यांच्या चेहऱ्यावर समाधान व हास्य पाहायला मिळत होते.
डॉ अजित थोरबोले यांनी लोकशाही चा हा उत्सव दापोली मतदारसंघात लीलया पेलला त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे.कुणाचीही अडचण होणार नाही याकडे स्वतः लक्ष देत,डॉ अजित थोरबोले यांनी ही प्रक्रिया राबवली.राबवलेली यंत्रणा ही आदर्श यंत्रणा असून एक रोल मॉडेलचा असल्याची प्रतिक्रिया येथे काम करणाऱ्या ४ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मुखी होती.
अनेकवेळा मतदान साहित्य जमा करताना अडचणी येतात,वादविवादाना सामोरे जावे लागते,अडचणी वाढल्याने केंद्राध्यक्षासह सगळ्या टीम ला ताटकळत थांबावे लागते.पण डॉ अजित थोरबोले व त्यांच्या सोबतच दापोली तहसीलदार,खेड तहासिलदार यांच्या सगळ्याच टीम ने चोख आदर्श यंत्रणा राबवल्याने सर्वत्र कौतुक व आभार व्यक्त होत आहेत.









