MNS President Raj Thackeray’s meeting today will be a record breaking meeting
मनसे नेत्यांचा दावा
रत्नागिरी | प्रतिनिधी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतील आजच्या सभेच्या तयारी पूर्ण झाली आहे. शहरात राज ठाकरेंची हाेणारी सभा पहिलीच सभा असल्याने संपुर्ण काेकणातील जनता या सभेस येईल असा अंदाज बांधला जात आहे.मनसे नेेते नितीन सरदेसाई यांनी यापुर्वीच्या सभांचे रेकाॅर्ड ब्रेक हाेईल असा दावा केला आहे.
रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुल मैदानावर राज ठाकरेंच्या सभेसाठीची मनसैनिक जय्यत तयारी करीत आहेत. रत्नागिरी शहरातील मनसैनिकांना या सभेला माेठी गर्दी हाेईल असा विश्वास आहे.
मनसेचे नेते नितीन सरदेसाई म्हणाले राज ठाकरे यांची काेकणातील रत्नागिरीतील पहिली सभा आहे. मी दाेन दिवासांपासून येथे आहे. अनेकांशी मी संवाद साधला. लाेक उत्साही आहेत. ही सभा रेकाॅर्ड ब्रेक सभा हाेईल असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला. मनसेने सभेची सर्व तयारी पूर्ण केल्याचे सरदेसाईंनी नमूद केले.










