खेड( प्रतिनिधी ) खेड बहिरवली मार्गावर गेल्या अनेक महिन्यापासून चोरटी वाळू विना परवाना उत्खन केलेली चिऱ्याचे डंपर धावत आहेत मात्र हे सुसाट डंपर धावताना अनेक वेळेला लहान-मोठे अपघात होत आहे विशेष म्हणजे हे डंपर विना नंबर प्लेट चे धावत असल्याने कारवाई बाबत प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे
रस्त्यावरून धावणार्या डंपर वर कोणतेच प्लेट नंबर दिसून येत नाही व लावले गेलेले नाही त्यामुळे अपघात करून वाहन पळून जाण्यास अनेक वेळा हे डंपर चालक यशस्वीहोत आहेत भर पावसाळा कालावधी मधे दाभोळ व वाशिष्टी खाडीतून जगबुडी खाडीतून सक्शनच्या पंपातून दिवस रात्र वाळू काढली जात होती आणि हे डंपर मध्ये भरून विना रॉयल्टी वाहतूक होत आहे
दरम्यान चिरे व्यवसायकानी देखील विनापरवाना दिवाळी दसरापूर्वीच चिऱ्याची खाणी सुरू केली आहेत यांना कोणी रॉयल्टी दिली असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे वाळू व चिऱ्यासाठी अनेक परप्रांती लोक येऊन या ठिकाणी काम करीत आहे मात्र त्यांची शासनाच्या सरकारी दरबारी मध्ये कोणतीच नोंद नसल्याने धक्कादायक बाब पुढे येत आहे काम करणारे कामगार हे बांगलादेशी आहेत का याची चाचपनी न करता त्यांना कामावर ठेवण्यात आले आहे मात्र या बाबत व्यावसायिकाला देणे घेणे काही नसल्याची बाब पुढे येत आहे
या मूळे संबंधित वाळू व चिरे व्यावसायिकाना कुणाचाही धाक नसल्याचे उघड होत आहे सध्या हे असे प्रकार दापोली व खेड तालुक्यांमध्ये जोरदार सुरू आहेत या बाबीकडे मंडल अधिकारी व तलाठी सतत दुर्लक्ष करताना दिसत आहे याबाबत प्रशासन या वरिष्ठ अधिकाऱ्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य मधून होत आहे












