खेड (प्रतिनिधी) – खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचालित एल टी टी इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजने आयोजित करण्बीयात आलेल्या १८ व्या राष्ट्रीय ऍबाकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी कु. विश्व उत्तमकुमार जैन याने ई गटात प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या यशात मोलाची भर घातली आहे. तसेच कु. अमाल इमाद खोत हिने द्वितीय क्रमांक मिळवला असून कु. आयशा इमाद खोत हिला उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. या यशामुळे एल टी टी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री अहमदभाई मुकादम, श्री परवेज मुकादम, श्री माजिद खतीब, श्री जयेश गुहागरकर, श्री प्रेमळ चिखले, श्री चंद्रकिरण वैद्य, श्री पुष्कर नेने, श्री विलीन पाटणे, समन्वयक श्री जॉय सर, सौ. एल्सी जॉय, मुख्याध्यापक श्री सारंग सर तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. कुडाळकर मॅडम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.













