महायुतीचेकार्यकर्ते उपस्थीत
कणकवलीचे पार्सल मतदारांनी झिडकारले!!
ऊबाठा राजन तेली विरोधात जोरदार घोषणा बाजी
दोडामार्ग | सुहास देसाई : राज्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व आर पी आय महायुतीच्या उमेदवाराचा भरघोस मतांनी विजय झाला त्यामुळे पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे तसेच या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना प्रचंड बहुमतांनी निवडून दिले तसें कुडाळ मधून डॉ. निलेश राणे. कणकवलीत नितेश राणे यांना प्रचार बहुमतांनी निवडून देत पुन्हा जिल्ह्यात महायुतीच्या झेंडा फडकवला त्या बद्दल दोडामार्ग शहरातील चौकात फटाके वाजवून घोषणा देत युतीच्या कार्यकर्त्यांनीजल्लोष केली यावेळी तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
महायुतीतील पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते ,संरपच ,उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने दोडामार्ग चौकात उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात महायुतीचा विजय राज्याचे शिक्षण मंत्री ना.दिपकभाई केसरकर साहेब व डॉ. निलेश राणे व नितेश राणे साहेब यांच्या विजयाचा जल्लोश साजरा करण्यात आला.भाजप शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी व ग्रामस्थ मतदार यानी उपस्थित होते यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस , भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सत्यवान गवस आर पी आय चे रमाकांत जाधव, राजेंद्र निंबाळकर राजेद्र म्हापसेकर दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, संतोष नानचे, महिला पदाधिकारी संध्या प्रसादी, सौ गडेकर, प्रवीण गवस, रामदास मेस्त्री, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते












