वेंगुर्लेतील जेष्ठ व्यापारी मनमोहन दाभोलकर यांचे दिपक केसरकर मित्रमंडळाने मानले आभार..

 

 

वेंगुर्ले l प्रतिनिधी :सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या विजयात दीपक केसरकर यांच्या पाठशी ठाम रहात त्यांना विजयाचा आशिर्वाद देणारे वेंगुर्ले शहरातील जेष्ठ व्यापारी मनमोहन दाभोलकर यांची सावंतवाडी येथील दिपक केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी भेट घेत मिठाई भरवत त्यांचे आभार मानले.

यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनिल डुबळे, अमर दाभोलकर, वेंगुर्लेतील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी शेखर धावडे आदी उपस्थित होते.