खेडमध्ये डेंग्यू साथीचा प्रादुर्भाव वाढतोय

खेड (प्रतिनिधी) खेड शहरात डेंग्यू साथीचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने नागरिकांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण कायम आहे. नगर प्रशासनाने डास प्रतिबंधक फवारणी करण्याची तसदी अद्यापही न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील भैरी भवानी नगर येथे डेंग्यूसदृश रूग्ण आढळले आहेत. हे रूग्ण खासगी रूग्णालयातच उपचार घेत असल्याने रुग्णांचा नेमका आकडा समोर आलेला नाही. या भागासह अन्य परिसरातही डेंग्यू साथीचा फैलाव वाढत असल्याचे समोर आले आहे. नगर प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने तातडीने सर्वेक्षणाची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे