लाल बहादूर शास्त्री हायस्कूलच्या वार्षिक शालेय क्रीडास्पर्धा उत्साहात सुरू 

 

 

मंडणगड l प्रतिनिधी: येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री हायस्कूल, दहागाव. या विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी सुरुवात झाली.

क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व दहागाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. मंगेश दळवी, तसेच शालेय समिती सदस्या श्रीम.अनिता गांधी , सदस्य श्री. महेंद्र सावंत, श्री. संतोष रहाटे तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. दत्ताराम जाधव हे उपस्थित होते .

सर्वप्रथम विद्यालया चे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले .

यानंतर उपस्थित संघ व खेळाडूंना कुमारी स्मरणिका गायकवाड हिने क्रीडा शपथ दिली. सर्वानी ती ग्रहण त्यानंतर सरपंच श्री. मंगेश दळवी यांनी मार्गदर्शन केले. क्रीडाक्षेत्रात अनेक मोठ्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून, आपली शारीरिक ,मानसिक क्षमता वाढवून, खेळामध्ये करिअर घडवावे. असे त्यांनी सांगितले .

त्याचबरोबर सामन्याचा निकाल काही असू द्या. खिळाडू वृत्ती महत्त्वाची आहे. खेळात हार जित असतेच; मात्र मार्गदर्शन, प्रेरणा,सराव आणि शिस्तीच्या सवयीतून आपण उत्तम खेळाडू घडू शकतो. असे त्यांनी सर्व उपस्थित खेळाडूंना सांगितले.

त्यानंतर सरपंच व शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. मंगेश दळवी यांच्या हस्ते खो-खोच्या मैदानात नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर माननीय मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांच्या हस्ते कबड्डीच्या मैदानात नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

अशाप्रकारे क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. इयत्ता दहावी अ विरुद्ध, दहावी ब असा कबड्डीचा रोमांचक उद्घाटनाचा सामना झाला.

त्याचबरोबर इयत्ता सातवी व सहावी मुलींच्या संघाचा खो-खो चा उद्घाटनाचा सामना खेळविण्यात आला.

या क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री. मनोज चव्हाण यांनी अपार मेहनत घेतली. मुलांच्या सहकार्याने व कर्मचारी भाई गुडेकर व गौड भाऊ यांना घेऊन मैदान आखणीपासून ते मैदान स्वच्छतेची सर्व कामे पूर्ण केली.

त्यांना विद्यालयातील शिक्षक श्री. विक्रम शेले, श्री. जितेंद्र कलमकर, श्री. किशोर कासारे तसेच शिक्षिका सौ. मानसी पालांडे, सौ.विनया नाटेकर, सौ. अनिता पवार व कृष्णा दळवी भाऊसाहेब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

शालेय क्रीडा स्पर्धा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक श्री. विक्रम शेले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.