रत्नागिरी | प्रतिनिधी
शहरानजीकच्या किल्ला येथील लाईट हाउसकडे जाणार्या रस्त्याच्या डाव्याबाजुला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.15 वा. सुमारास करण्यात आली.
मुसद जाकीर वाडकर (29),आझाद मुस्लिम चौधरी (28) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही त्या ठिकाणी आपल्या समोर दारुची बाटली आणि ग्लास घेउन बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











